crop loan interest rate: ‘या’ सवलत योजनेअंतर्गत चक्क 0 टक्के व्याजदरात मिळणार कर्ज, या जिल्ह्याला मिळाले तब्बल 57 कोटी

crop loan interest rate: कित्येक लोक व्यवसायासाठी विविध बँकांचं कर्ज घेत असतात. शेतकरी देखील शेतीसाठी बँकेकडून पीककर्ज (Crop Loan) घेत असतात. कित्येक धनदांडगे उद्योगपती कर्जफेड न करता परदेशात निघून जातात, अशी कित्येक उदाहरणे भारतामध्ये घडलेली आहेत. पण शेतीतील पिक उत्पन्नाच्या जोरावर शेतकरी त्या पीक कर्जाची (crop loan) नियमित परतफेड करत असतात. या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता व्याजात सवलत देखील देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने एक योजना (crop loan list) चालू केली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असे या योजनेचे मुख्य नाव आहे.

काय आहे ही योजना | crop loan interest rate

या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची (crop loan) नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत अल्पमुदत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये कर्ज घेतल्यावर व्याजामध्ये 3 टक्के सवलत मिळत होती. तसेच 1 ते 3 लाख रुपये कर्ज (crop loan list) घेतले तर व्याजदरामध्ये 1 टक्के एवढी सवलत मिळत होती. मात्र या सवलतीत आता बदल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना व्याजदरामध्ये आता अजून जास्त सवलत मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी व ग्रामीण बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

योजनेत झाले असे बदल | crop loan interest rate

नुकतंच महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget) पार पडलं आहे. या अधिवेशनात शासनाने अनेक आकर्षक व चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामधील एक या योजनेसंदर्भात निर्णय आहे. आता डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने-अंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे 0 टक्के व्याजदरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून या व्याजदरात 3% व केंद्र सरकारकडून 3% म्हणजे एकूण 6% एवढी सवलत मिळणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना सदरचे पीक कर्ज हे 0% व्याजदरामध्ये उपलब्ध होणार आहे.

या जिल्ह्याला मिळाले तब्बल 57 कोटी (crop loan interest rate)

या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला लाभ होत आहे. पुणे जिल्ह्यातील 2,88,917 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटला आहे. या नियमित परतफेड (crop loan) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या सवलतीचे एकूण 57 कोटी 31 लाख 77 हजार 25 रुपये जमा झालेले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त निधीमधून तसेच शासनाकडून प्राप्त निधीमधून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

तसेच नियमित कर्ज परतफेड झाल्याने बँकांची वसुलीमध्येही वाढ झाली आहे. यामुळे बँकांनाही फायदा होत चालला आहे.

Leave a Comment