धुळे: राज्यामधील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय कर्मचारी 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करत आहेत.
Employee Strike: या संपात धुळे जिल्ह्यातीलही तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी (old pension scheme Notice from) सहभागी झालेले आहेत.
त्यामुळे शासकीय कामकाज सुरळीत पार पाडण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संपात सहभागी सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना जाहीर नोटीस पाठवली आहे, सदर नोटीसमध्ये कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.
हे पण वाचा: PM Svanidhi Yojana: अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा
Employee Strike
या संपात सहभागी होऊन कार्यालयीन शिस्तभंग करणे ही आपली कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ नुसार असल्यामुळे आपण शिस्तभंग कार्यवाहीसाठी पात्र ठरत आहात, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये केंद्र सरकारचे ‘काम नाही वेतन नाही’ हे धोरण राज्य सरकारनेही अनुसरले आहे. त्यामुळे आपला संप कालावधी विनावेतनसाठी गणला जाईल.
तसेच आपण संपामध्ये भाग घेतलेला कालावधी हा सेवेतील खंड कालावधीही गणला जाईल याची नोंद घ्यावी व नियमित कर्तव्यावर हजर होऊन शासकीय कामकाज सुरळीत पार पडण्यास सहकार्य करावे. वेळेअभावी सर्व संपात सहभागी कर्मचाऱ्यांना ही जाहीर नोटीस काढण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी नोटीस मध्ये म्हटले आहे.