Insurance Claim | अवकाळी पावसाने नुकसान झालंय ? चिंता नका करू ! पीक विम्यासाठी असा करा क्लेम

Insurance Claim | देशामध्ये एकीकडे चक्रीवादळाच्या (Insurance Claim) पार्श्वभूमीवर अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. अशात नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, तर काय करावे ? याबाबत माहिती घेऊयात.

पीएम पीक विमा योजना | Insurance Claim

नैसर्गिक संकटे आल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. याकरिता पीएम पीक विमा योजना (PM crop insurance Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये कमी पैसे भरून शेतकरी शेतीतील पिकाचा विमा भरतात. अशात नैसर्गिक संकटात शेतीतील पिकांचे नुकसान झाले तर त्यांना क्लेम करता येतो. यामध्ये विमा कंपनी नुकसानीची भरपाई करते.

शेतकरी ठरवतात पिकाचा विमा काढावा की नाही ? Insurance Claim

अगदी सुरुवातीच्या काळामध्ये शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा भरणे सरकारने बंधनकारक केले होते. मात्र सध्या तरी आपल्या पिकाचा विमा (Crop insurance) काढावा की नाही हे शेतकऱ्याच्या मनावर अवलंबून आहे. सध्या अनेक शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतात. दरम्यान विमा काढल्यानंतर शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई कशी मिळते ते पाहुया?

पीक विमा कसा काढावा ? Insurance Claim

ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहे तसेच ज्यांनी इतर कोणतेही कृषी कर्ज घेतले आहे ते शेतकरी त्याच बँकेत पिकांचा विमा काढू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना बँकेत एक फॉर्म भरावा लागणार आहे. महत्त्वाची बाब Insurance Claim म्हणजे बँकेकडे शेतकऱ्यांची जमीन आणि इतर कागदपत्रे असल्याने विमा सहज भरता येतो. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलेच नाही ते कोणत्याही बँकेकडून हा विमा भरू शकतात.

Documents | पीक विमा काढण्यासाठी कागदपत्रे

१) आधारकार्ड
२) जमिनीशी संबंधित कागदपत्रे
३) शेतात पेरलेल्या पिकाचा तपशील
४) बँकेतील मतदार कार्ड

Eligiblity | पात्रता

जर शेतकऱ्यांच्या ३३% शेतीतील पिकाचे नुकसान झाले असेल, तर शेतकऱ्यांना पिक विमाकरिता अर्ज करता येतो. पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून शेतकरी पिकाच्या नुकसानीची माहिती देऊन क्लेम करू शकतात.

Leave a Comment