Mhada: सध्याच्या काळात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहे. शहरी भागात तर घर खरेदी करणं म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला अशक्य झालं आहे.
त्यामुळे अशावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास (Mhada) कडून परवडणाऱ्या भावामध्ये मिळणाऱ्या घरांची वाट सर्वसामान्य माणूस अगदी आतुरतेने बघत असतात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या आर्थिक वर्षामध्ये म्हाडा कडून या महानगरात चक्क 12,724 घर बांधण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर, अमरावती येथे म्हाडाची घरे मिळणार आहेत.
म्हाडाने 2023-24 साठी 10,186 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प घोषित केला आहे. यामधील 5800.15 कोटी इतक्या रुपयांची तरतूद म्हाडातील घरे बांधकामासाठी होणार आहे. या बजेटच्या माध्यमातून मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर, अमरावती येथे तब्बल 12,724 घरे बांधण्यात येणार आहेत. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये हजारो लोकांची घर घेण्याची स्वप्ने पूर्ण होणार आहेत.
कोणत्या विभागात किती घरे बांधणार? Mhada
म्हाडाकडून मुंबईमध्ये 2,152 घरे बांधली जाणार आहेत. त्याकरिता 3664.18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच कोकण मंडळांतर्गत 5,614 घरे बांधली जाणार आहे. यासाठी 741.36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात केलेली आहे. पुणे विभागामध्ये 862 घरांचा निर्णय होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये 540.70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर मंडळांतर्गत 1,417 घरे तयार होणार आहेत. त्यासाठी 417.85 कोटींची तरतूद करण्यात केलेली आहे, छ. संभाजीनगर येथे 1,497 घरे बांधली जाणार आहे. यासाठी 212.08 कोटी, नाशिकमध्ये 749 फ्लॅट बांधण्यात येणार आहे. नाशिकसाठी 77.32 कोटी आणि अमरावती विभागामध्ये 413 घरे बांधली जाणार आहे. त्यासाठी 146.24 कोटींची तरतुद केली आहे. Mhada