मैदानी चाचणी झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर Police Recruitment पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महसंचालक संजय कुमार यांनी सांगितली आहे. लेखी परीक्षा 90 मिनिटांची व 100 गुणांची आहे. त्याचे स्वरूप ‘ऑब्जेक्टिव्ह’ प्रमाणे असेल.
परीक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे Police Recruitment
लेखी परीक्षेचे केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना “MH-IT” एमएच-आयटीकडून परस्पर हॉल तिकीट उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्या शाळा, महाविद्यालय इमारतीत तसेच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, तेथे परीक्षेची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. अन्यथा प्रत्येक वर्गात स्वतंत्र व्हिडिओग्राफर निवडला जाणार आहे. परीक्षेच्या दिवशी वेळेच्या 2 तासा आधी उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी सांगण्यात आलेले आहे.
मैदानी चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे छायाचित्र व अंगठय़ाचा ठसा याची पोलिसांनी नोंद घेतलेली आहे. लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणारे अर्जदार तेच आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना १००% आळा बसणार आहे.