RTE Lottery: मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळेमध्ये 25% जागा आर्थिक दुर्बल मागास आणि अल्पसंख्यांक मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. यावर्षी राज्यांमधील 1,01,969 विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. 5 एप्रिल 2023 या रोजी प्रवेशाची लॉटरी निवड यादी काढणार आहे.
आपल्या मुलांना चांगल्या नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी राज्य शासनाने आरटीई (RTE Addmission) अंतर्गत 25% जागा शिल्लक ठेवल्या आहेत. कायद्यानुसार प्रत्येक इंग्लिश स्कूलमध्ये 25% जागा शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षांमध्ये राज्यातील 8,828 इंग्रजीच्या खाजगी शाळांमध्ये आरटीई (RTE Lottery) द्वारे प्रवेश मिळणार आहे.
हे पण वाचा: Incentive Grant 2023: 50,000 अनुदान 5 वी यादी जाहीर, लगेच यादीत नाव पहा
यावर्षी राखीव जागा 1,01,969 असून या जागेसाठी पूर्ण राज्यातून 30,66,562 विद्यार्थ्यांचे म्हणजे तीन पट अर्ज प्राप्त झालेले आहेत. पण यामध्ये काही दोन वेळेस केलेले अर्ज, अपात्र, त्रुटी असलेले अर्ज देखील आहेत. या अर्जाची पडताळणी करण्यासाठी सध्या NIC च्या माध्यमातून सुरू आहे. हे काम सध्या शेवट टप्प्यामध्ये आहे ते पूर्ण झाल्यावर नंतरच लगेच लॉटरी काढणार आहेत.
आरटीई ची प्रवेश (RTE Addmission) प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप चालणार नाही. लॉटरी काढल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी ठराविक मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर या लॉटरी द्वारे काही विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्यास, काही रिक्त जागा राहिल्यास प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल.
प्रवेश घेण्यासाठी ही कागदपत्रे तयार ठेवा
आरटीई लॉटरीमध्ये निवड (RTE Lottery) झाल्याच्या नंतर प्रवेश घेण्यासाठी शाळेत जाताना पालकांनी त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला मुलांचे आधार कार्ड अर्ज ची ऑनलाईन प्रिंट अर्जा वेळी भरलेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. खुल्या वर्गातील व एस ई बी सी वर्गातील मुलांसाठी 1,00,000 पेक्षा कमी उत्पन्न असलेले पालकाचा उत्पन्न दाखला आवश्यक आहे. त्यामुळे तो सोबत घेऊन जावा. ज्या दिवशी सोडत यादी जाहीर होणार आहे. त्या दिवशी अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक दिलेला असेल त्या मोबाईल क्रमांकावर निवड झाल्याचा मोबाईल वर मेसेज येईल.
RTE Lottery: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये लॉटरी
RTE Maharashtra Lottery Result 2023: आरटीई अंतर्गत केलेल्या अर्जाची सध्या पडताळणी चालू आहे. काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रवेशाची लॉटरी काढण्यात येईल. त्यानंतर प्रवेश किती विद्यार्थ्यांनी घेतले हे पाहून प्रतीक्षा यादीतील मुलांना देण्यात येईल.