‘आनंदाचा शिधा’ आजपासून मिळणार, वाचा महत्वाची बातमी…

महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आज गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्यात येणार आहे. हा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला असून आज (दि. 22 मार्च) मराठी नवीन वर्षांपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार.

राज्यामधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील (APL) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे.

आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी आयोजित करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिलेल्या आहे. राज्यामधील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील (APL) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणा डाळ, साखर व एक लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस वाटप करण्यात येणार आहे.

हे पण वाचा: Pik Vima Vatap: पिक विम्याची रक्कम 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना द्या विमा कंपन्यांना राज्य सरकारचे आदेश

‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. शिधा खरेदी करण्याकरिता 455.94 कोटी रुपये व इतर अनुषंगिक खर्च 17.64 कोटी रुपये अशा एकूण 473.58 कोटी रुपये एवढा अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. दरम्यान याबाबतचा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment