Matrutva Vandana Yojana: केंद्र सरकार मार्फत सामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम सरकार करते. तसेच केंद्र सरकार महिलांच्या (Matrutva Vandana Yojana) सन्मानासाठी आणि त्यांना सोयी सुविधा प्राप्त होण्यासाठी देखील बऱ्याच योजना राबवण्यात येत आहेत. याचपैकी एक गर्भवती महिलांसाठी राबवण्यात येणारी पीएम मातृत्व वंदना योजना (Matrutva Vandana Yojana) आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
कोणाला मिळणार लाभ?
देशात मातृत्व वंदना योजना ही गर्भवती महिलांसाठी राबवण्यात येत आहे. तर मातृत्व वंदना (Matrutva Vandana Yojana) योजनेतंर्गत विवाहित गर्भवती महिलांना 6,000 रुपये मिळतात. महिलांची प्रकृती व्यवस्थित रहावी मूल कुपोषित जन्माला येऊ नये, असे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. एकंदरीत या योजनेचा फायदा आई आणि बाळाला देखील होत आहे.
कसे मिळतात 6 हजार? | Matrutva Vandana Yojana
गर्भवती महिलांना या योजनेचे 6,000 टप्प्याटप्प्याने दिले जातात. महिलांना पहिल्या टप्प्यात 1,000 रुपये दिले जातात. तर 2 ऱ्या टप्प्यामध्ये 2,000 रुपये दिले जातात. त्याप्रमाणे 3 ऱ्या टप्प्यात देखील महिलांना 2,000 रुपये दिले जातात. यानंतर जेव्हा महिलेची प्रसूती होते त्यानंतर 1,000 रुपये दिले जातात.
कसा मिळेल योजनेचा लाभ?
- गर्भवती महिलेचे वय किमान 19 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
- या योजनेत तुम्हाला फक्त ऑफलाइन अर्ज करता येतो.
- सरकारकडून महिलांच्या खात्यात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये खात्यात ट्रान्सफर करण्यात येतात.
- ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आलेली आहे.
हे पण वाचा: Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर