Crop Damage: गतसाली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. याचा खूप मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. दरम्यान गतवर्षी अनेक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेती पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत होती. ती मागणी आता मान्य करण्यात आली आहे. ही नुकसान भरपाई ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितली आहे.
इतक्या कोटींची मिळणार नुकसान भरपाई | Crop Damage
पुणे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास चालू झाली आहे. त्यामध्ये 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या 85,445 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. या नुकसान भरपाईची रक्कम चक्क 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये एवढी आहे. ही नुकसान भरपाई रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरण्यास चालू झाली आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगतली.