Crop Insurance: या जिल्ह्यांचा पिक विमा वाटप सुरु

Crop Insurance: पिक विमा मधील काही महत्त्वपूर्ण माहिती आहे. शेतकरी बांधवांनो पिक विमा लाभ मिळवण्यासाठी पात्र असलेला महत्त्वाचा जिल्हा म्हणजे यवतमाळ आहे. कारण, या जिल्ह्यामध्ये दहा पेक्षा जास्त वेळेस अतिवृष्टी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं. पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी यांना अजूनही पिक विमा वाटप केला जात नव्हता. शासकीय कंपनी ओळखले जाणारी एग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया (Agriculture Crop Insurance Of India) या कंपनीच्या माध्यमातून जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये पिक विमा (Crop Insurance) योजना राबवण्यात येते.

या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विमा (Crop Insurance) वाटप करण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. या सर्वांच्या पार्श्वभूमी वर आता AIC या कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वाटप करण्यास सुरुवात करण्यात झाली आहे. याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मका या पिकाचा दावा (Claim) असेल, सोयाबीनचा क्लेम असेल या क्लेम साठीचा पिक विमा यादी बरोबर काही मंडळामध्ये काढण्यात आलेले आहेत. या आधी देखील काढलेल्या यादी सूचित मंडळांमध्ये सुद्धा पिक विमा वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे.

वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पिक विमा वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे रक्कम जमा केली जाईल.

यवतमाळ जिल्ह्या पिक विमा वाटप (Crop Insurance)

सर्वात जास्त प्रमाणात बाधित झालेला व सर्वात जास्त अपेक्षा असलेल्या जिल्हामध्ये यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यासाठी चांगला पिक विमा येईल, अशी अपेक्षा होती. पण कंपनीच्या माध्यमातून आता खूप कमी रक्कम वाटप करायला सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आधी सूचना देखील काढलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात मंडळ बाधित झालेली आहे. आता पिक विमा देताना नेमका क्लेमचा पिक विमा दिला जाईल की त्या मंडळातील बाधित शेतकऱ्यांना आधी सुचणेनुसार पिक विमा दिला जातोय हा देखील त्या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे. आपण याबाबत शेतकऱ्यांसाठी कन्फर्म अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की सांगणार आहोत.

join Whatsapp Group

पण आधी सूचित मंडळामध्ये तुमचं गाव नसेल आणि तुम्हाला जर पिक विमा मिळालेला असेल तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर तो तुमचा पिक विमा 100% असणार आहे. कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अधि सूचित मंडळामध्ये नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा पिक विमा मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे.

1 thought on “Crop Insurance: या जिल्ह्यांचा पिक विमा वाटप सुरु”

Leave a Comment