Onion Subsidy | मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी निघाले आहे. राज्यामध्ये कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी चिंतेत होते. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा चांगलाच रंगला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली होती. सरकारने याबाबत (State Government) कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे.
अनुदानाची रक्कम वाढली | Onion Subsidy
राज्य सरकारने कांदा अनुदान (Onion Subsidy) साठी अधिसूचना जाहीर केली असून, या अधिसुचनेनुसार शेतकऱ्यांना आता आनंदाची माहिती मिळणार आहे. सरकारने कांदा अनुदानाची रक्कम वाढवली असून ती 300 वरून 350 रुपये केली आहे. या अनुदान मध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.
200 क्विंटलसाठी अनुदान मिळणार
राज्यामधील सगळ्या बाजार समित्या, खासगी बाजार समित्या, नाफेडला कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई बाजार समितीमध्ये कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. दरम्यान एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटलसाठी अनुदान देणार आहेत.
हे पण वाचा: Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर
यांना मिळणार अनुदान
महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या राज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा यामधून वगळण्यात आले आहे. सरकारच्या अधिसुचनेनुसार दुसऱ्या राज्यामध्ये कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्यासाठीचे अनुदान मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2013 पासून 31 मार्च 2023 या दोन महिन्यांच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे.
अनुदानासाठी असा करा अर्ज
फक्त लाल कांद्यासाठीच हे अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीमध्ये कांदा विक्री केली आहे, त्या ठिकाणी कांदा विक्री पावती, सात बारा उतारा व बँक खात्याची माहिती अर्जासह जमा करावी लागणार आहे. यासंबंधीचे प्रस्ताव बाजार समिती सादर करणार आहे व थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे.