Talathi Bharti 2023

मिळालेल्या नवीन माहिती नुसार, राज्यात लवकरच मोठी तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून उमेदवार या भरतीची वाट बघत होते. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे एकाच तलाठ्याच्या अंगावर अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता. तसेच कामांना फार वेळ लागत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्या भरतीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.